Skip to main content

क्रिप्टो बाजार म्हणजे काय? तो शेअर बाजारापेक्षा वेगळा कसा असतो? (What Is A Crypto Market? How Is It Different From the Stock Market?)

By नोव्हेंबर 16, 2021जानेवारी 24th, 20224 minute read

हल्ली क्रिप्टो बाजार बरेच प्रचलित आहे असे वाटते. क्रिप्टोकरन्सी देऊ करत असलेला उच्च परतावा पाहून अनेक लोकांनी त्यात खूप स्वारस्य दाखवले आहे. सीएफडी अकाऊंट द्वारे किंवा क्रिप्टो एक्स्चेंज मधून क्रिप्टोकरन्सीची खरेदी किंवा विक्री करून क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग, क्रिप्टोच्या किंमतींच्या चढउताराचा अनुमान लावते. क्रिप्टोकरन्सी उद्योग हा अत्यंत अस्थिर बाजार आहे. याच्या या अस्थिरतेमुळे याची तुलना शेअर बाजारशी केली जाते. या दोघांच्या बाबतीत लोकांचा अनेकदा यामुळे गोंधळ होतो. 

पण वैतागू नका, कारण आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत. शेअर बाजार आणि क्रिप्टो बाजार यातील फरकांची विस्तृत मार्गदर्शिका येथे देण्यात आलेली आहे. म्हणूनच, पुढच्या वेळी तुमच्या मित्राने क्रिप्टोबद्दल तुम्हाला भाषण देण्यास सुरुवात केला तर तुम्हीदेखील काही माहिती त्याला देऊ शकाल. पुढे वाचा! 

क्रिप्टो बाजार म्हणजे काय? 

अगदी मूळ सिद्धांतापासून तुमची सुरुवात करूया. वस्तूंचा व्यापार होतो त्या खरेदी किंवा विक्री केली जातात अशी जागा म्हणजे बाजार किंवा बाजारपेठ. म्हणूनच जिथे क्रिप्टोकरन्सीचा व्यापार होतो ती जागा म्हणजे क्रिप्टो बाजार असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परंतु यात एक मेख आहे. त्यांना भौतिक अस्तित्व नाही. ते फक्त तुमच्या स्क्रीनवर उपस्थित आहेत आणि फक्त ब्लॉकचेनवर कार्यान्वित केले जातात. 

क्रिप्टो नेटवर्क विकेंद्रित आहेत ज्याचा अर्थ असा की ती अनुशासित किंवा सरकारसारख्या केंद्रीय अधिकरणाद्वारे समर्थित नाहीत. किंबहुना, ती नेटवर्कच्या संपूर्ण जाळ्यातून चालतात. परंतु, क्रिप्टोकरन्सींची खरेदी आणि विक्री क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजमधून करता येते. ती वॉलेटमध्येदेखील साठवता येतात आणि या दोन्ही सुविधा वझिरएक्सवर उपलब्ध आहेत.

पारंपारिक करन्सींच्या तुलनेत, क्रिप्टोकरन्सी या ब्लॉकचेनवर संग्रहित मालकीचे केवळ एक सामायिक डिजिटल नोंद म्हणून कार्यान्वित असतात. एक वापरकर्ता दुसर्‍या वापरकर्त्यास क्रिप्टोकरन्सी कॉइन पाठवू इच्छितो तेव्हा त्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये ते पाठवले जाते. मायनिंग प्रक्रियेद्वारा ब्लॉकचेनरवर त्याची सुनिश्चिती आणि पुष्टी होत नाही तोपर्यंत हा व्यवहार निश्चित झाला असे मानले जात नाही. नवीन क्रिप्टोकरन्सी टोकन निर्माण करण्यासाठीदेखील ही प्रक्रिया वापरली जाते. 

Get WazirX News First

* indicates required

आपण अनेक वेळा ब्लॉकचेनचा संदर्भ देत असल्याने, ब्लॉकचेन म्हणजे नक्की काय हा तुमच्या मनातील एक सामान्य प्रश्न येऊ शकतो. तुम्हा लहानपणी लेगो ब्लॉकबरोबर खेळत होता ते आठवतंय का? त्यांना जोडून तुम्ही मनोरे कसे बनवत होता?

ब्लॉकचेनदेखील जवळ जवळ तेच काम करते. …. फक्त या परिस्थितीत, लेगो ब्लॉकऐवजी डेटाचे ब्लॉक वापरले जातात. चेनच्या पुढच्या भागात नवीन ब्लॉक जोडून, ’ब्लॉक’मधील व्यवहारांचे दस्तावेजीकरण करून ब्लॉकचेन काम करते.

गुन्हेगार आणि पैशाची अफरातफर करणार्‍या लोकांशी संलग्न म्हणून कुविख्यात असलेल्या क्रिप्टोकरन्सीने त्याच्या आधीच्या स्थितीपासून लांबचा पल्ला गाठला आहे. गेमिंग व्यवसाय, मीडिया आणि आरोग्य सेवांमध्येखील क्रिप्टोकरन्सी क्रांती आणू शकेल असे आज अनुमान करण्यात आले आहे. परंतु, क्रिप्टो बाजार हा शेअर बाजारापेक्षा खूप वेगळा आहे. तुम्ही क्रिप्टो बाजारामध्ये नवशिके परंतु शेअर बाजारामध्ये पारंगत असाल तर हे क्षेत्र तुम्हाला कठीण वाटू शकते. स्टॉक आणि क्रिप्टोमधील सर्वात मोठा फरक प्रत्येकाचे मूल्यांकन कसे केले जाते हा आहे. स्टॉकना कायदेसंमत कंपन्यांचा पाठिंबा असतो ज्यांनी फायदा कमावणे अपेक्षित असते. त्यांच्या मूल्यांकनाचा भाग म्हणून त्यांची भौतिक मालमत्ता संलग्न असते. खरे तर, तुम्ही गणितात पारंगत असाल तर गणित वापरून स्टॉकची किंमत योग्य प्रकारे काढली आहे का याचे अनुमान आपण सहजपणे करू शकता. 

याच्या तुलनेत, बहुतेक वेळा क्रिप्टोकरन्सींना कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचा पाठिंबा नसतो. त्यांच्यापैकी बहुतेकांचे मूल्यांकन त्यांच्या गाजावाजावर आधारित असते. परंतु काहींच्या मूल्यांत त्यांच्या कार्यविधीच्या आधारे वाढ होऊ शकते. परिणामस्वरूप, हे अधिक व्यक्तिनिष्ठ आहे. म्हणूनच, एखादी विशिष्ट करन्सी त्या मूल्याची खरोखर आहे का याचे अनुमान लावणे नेहमीच सोपे नसते. 

शेअर बाजार आणि क्रिप्टो बाजारामधील फरक 

वर उल्लेखित मूल्यांकनातील फरकाव्यतिरिक्त, दोन बाजारांमध्ये इतर अनेक मूलभूत फरक आहेत. चला, आपण त्यांची चर्चा करूया. 

#1 विकेंद्रित आणि केंद्रित एक्स्चेंज 

वर उल्लेख केल्याप्रमाणे, क्रिप्टोकरन्सी विकेंद्रित आहेत तर स्टॉक हे केंद्रित संरचनेखाली आहेत. परिणामस्वरूप, याचा अर्थ असा की क्रिप्टो कार्यविधी आणि व्यवहार कोणत्याही केंद्रीय बॅंकेकडून किंवा केंद्रीय अधिकरणाकडून नियंत्रित नाहीत. क्रिप्टो वापरकर्त्यांना हे विकेंद्रीकरण खूप पारदर्शकता आणि नियंत्रण देऊ करते. तथापि, स्टॉक आणि क्रिप्टो यांद्वारे कमावलेला नफा करपात्र आहे. 

या नियमन नसलेल्या प्रकाराचा एक तोटा म्हणजे क्रिप्टो बाजार फसवाफसवीच्या धोक्याचे अधिक सहजपणे भक्ष्य बनू शकते. भारतातील स्टॉक एक्स्चेंज बाजार केंद्रीय नियमनांतर्गत काम करते. गैरकारभार आणि फसवाफसवीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि सेक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (सेबी) त्याचे नियमन होते. 

#2 अस्थिरता/विस्फॊटकता

स्टॉक आणि क्रिप्टोकरन्सी यांना काही वेळा एकाच स्तरावर लेखले जाते कारण दोन्हीही बाजारमधील बदलांवर अवलंबून असतात. परंतु त्यांची अस्थिरता यात खूप फरक आहे. क्रिप्टो एक्सचेंज हा अत्यंत प्रलोभनीय व्यापार पर्याय अहे कारण त्याच्या उदयास येणारा बाजारमुळे त्यात खूप जोखमी आहेत. 

या मुळे क्रिप्टो खूप अस्थिर झाले आहे आणि परणामस्वरूप त्वरित आणि उच्च परताव्याचा स्त्रोत बनले आहे. याच्या तुलनेत, शेअर बाजार हे खूप स्थिर आहे आणि काही बाबतीत तर पारंपारिकदेखील आहे आणि ते विविध व्यापार पर्याय देऊ करते. शेअर बाजारामध्ये गुंतवणूकीवर परताव्याचा अंदाज बांधणे तसे बरेच सोपे आहे. 

#3 लाभावर नियंत्रण करणारे घटक 

शेअर बाजार आणि क्रिप्टो बाजार हे दोन्हींचे मागणी आणि पुरवठा यांद्वारे नियमन होते. परंतु, मागणी आणि पुरवठा यांच्यावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक बदलू शकतात. शेअर बाजाराचे नियमन राजकारणातील चर्चा, त्या स्टॉकची मालकी असणार्‍या कंपनीच्या बातम्या, नैसर्गिक आपत्ती इत्यादींद्वारे होते. 

याच्या तुलनेत, क्रिप्टो किंमतींचे नियमन सामान्यत: त्याने निर्माण केलेली कुजबूज आणि गाजावाजा यामुळे होते. आणि मी तुम्हाला एक रास्त चेतावणी देऊ इच्छितो, याचे कारण एलॉन मस्कच्या त्या ट्विटएवढे नगण्य असू शकते. काही वेळा क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यातील चढउताराचे कारण क्रिप्टोकरन्सी कार्यावरदेखील अवलंबून असू शकते. 

निष्कर्ष

संपत्ती जमा करण्यासाठी चांगल्या स्त्रोतात पैसा गुंतवावा असे लोकांना वाटणे साहजिक आहे. सर्व प्रकारच्या गुंतवणूक पर्यांयांबरोबर काही अंशी जोखीमदेखील येते. परंतु, अस्थिरतेच्या बाबतीत प्रत्येक गुंतवणूक वेगळी असते आणि प्रचंड प्रमाणातील आघातांपासून त्यातील काही स्वत:चे संरक्षण सहजपणे करू शकतात. या कारणाकरिता, 21व्या शतकात, क्रिप्टोकरन्सी आणि शेअर बाजार हे गुंतवणूकीचे पर्याय म्हणून सर्वोच्च स्थानावर उदयास आले आहेत. यामुळे क्रिप्टो बाजार वि. शेअर बाजार या वादविवादास उधाण आले आहे. तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार, यातील कोणतेही एक किंवा दोन्हींमध्येही गुंतवणूक करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. विविध लोकप्रिय क्रिप्टो एक्सचेंजमध्ये सहजपणे नजर टाकून तुम्ही क्रिप्टोमध्ये सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकता आणि वझिरएक्स त्यापैकी एक आहे.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply