Skip to main content

भारतात डोजकॉइन कशा प्रकारे खरेदी करावे? (How to Buy Dogecoin in India)

By नोव्हेंबर 29, 2021डिसेंबर 3rd, 20214 minute read

क्रिप्टो बाजारात दररोज प्रवेश करणार्‍या लोकांची वाढती संख्या पाहू जाता, क्रिप्टोचे वेड नक्कीच संपण्याच्या मार्गावर नाही. अत्यंत अस्थिर आणि स्फोटक स्थिती असूनही अविश्वसनीय परतावा देण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे, आधुनिक काळातील गुंतवणूकदारांसाठी ही क्रिप्टोकरन्सी संपत्तीचा आवडता प्रकार बनली आहे. पट्टीचे गुंतवणूकदार आणि संस्था ते इतर प्रत्येक जण क्रिप्टोकरन्सीच्या प्रवाहात हात धुवून घेत आहेत असे दिसत आहे.

बिटकॉइन ही बर्‍याच काळापासून सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी म्हणून अस्तित्वात असली तरीही, आल्टकॉइन्स (ऑल्टरनेटिव्ह कॉइन्स/पर्यायी चलन किंवा बिटकॉइन व्यतिरिक्त इतर सर्व क्रिप्टोज) नक्कीच त्याची जागा घेत आहेत. एथर्युम (Ethereum), कार्डानो (Cardano) आणि एक्सआरपी (XRP) या सारख्या अनेक आल्टकॉइन्सनी देखील मागील काही महिन्यात लक्षणीय वाढ नोंदवली आहे; आणि त्यांनी कमावलेला वर्ष-निहाय लाभ पाहू जाता त्यांनी बिटकॉइनला देखील मागे टाकले आहे.डोजकॉइन (DOGE) हे असेच एक आल्टकॉइन आहे जे सध्या क्रिप्टो बाजारात तुफान गाजत आहे. 

सुरुवातीस केवळ एक विनोद म्हणून गणल्या गेलेल्या या कॉइनने सर्वोत्कृष्ट 10 क्रिप्टोकरन्सीजच्या यादीत स्थान मिळवले आहे; वर्षाच्या प्रारंभी 1 सेंटपेक्षा कमी व्यवहार केलेल्या या आल्टकॉइनची आजमितीस व्यापाराची किंमत $0.238 आहे. आणि याचे सध्याचे बाजार भांडवल मूल्य $31.3 ($3130 कोटी) आहे. डोजकॉइनचे चाहते या कॉइनला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल अभिमानाने व उघडपणे बोलतात आणि डोजकॉइनच्या किंमती लवकरच $1 डॉलर होतील असा विश्वास ठेवून, “डोज टु द मून/डोज गगनास भिडणार (किंमती वाढणार…. याची बोलीभाषा) या सिध्दांताचा प्रचार करतात. 

डोजकॉइन: संक्षिप्त इतिहास आणि लोकप्रियतेत वाढ

सॉफ्टवेअर अभियंते बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी सन 2013 मध्ये मीम म्हणून संकल्पना केलेले डोजकॉइन, बिटकॉइनला वाहलेली उपहासात्मक श्रध्दांजली आहे. केवळ गंमतीशिवाय याचे इतर कोणतेही काम नव्हते. खराब शब्दलेखनाची सवय असलेल्या शिबा इनु कुत्र्यासंबंधीच्या इंटरनेट मीमपासून या कॉइनचे नाव घेण्यात आले, आणि म्हणूनच हे संज्ञा “डॉग” ऐवजी “डोज” आहे. पण आता हा विनोद राहिलेला नाही, डोजकॉइन आता घातांकीय चक्रवाढ अनुभवत आहे आणि विशेषत: याचे कारण आहे मार्क क्युबन, स्नूप डॉग्ग, एलॉन मस्क इ. सारख्या गणनीय आणि प्रभावशाली व्यक्ती. डॉजकॉइनच्या वेगवान वाढीचे श्रेय अंशत: मार्च 2021 मधील गेमस्टॉप सागा च्या परिणामांना जाते. या कार्यक्रमानंतर गेमस्टॉपच्या वाढीस पाठिंबा देणारे किरकोळ व्यापारी DOGE सारख्या क्रिप्टोकरन्सीजकडे गेले. या व्यतिरिक्त, डोजकॉइनच्या समर्थनात एलॉन मस्कच्या नियमित परंतु संक्षिप्त ट्वीट्सनी देखील क्रिप्टोची विश्वासार्हता वाढवण्यात मदत केली. 

या नंतर मे 2021 मध्ये मस्कने सॅटरडे नाइट लाइव्ह मध्ये आपली हजेरी लावली तेव्हा डोजकॉइनसाठी हा मोठा महत्त्वाचा क्षण होता.

या कार्यक्रमापूर्वी, एलॉन मस्क या कार्यक्रमात डोजकॉइनचा उल्लेख करेल की नाही या बद्दल क्रिप्टोकरन्सीच्या व्यापार्‍यांनी व निरिक्षकांनी उघडपणे तर्क-वितर्क केले होते. हे तर्क-वितर्क आणि त्या नंतर या कॉइनसंबंधीची चर्चा यांनी कोट्याधीश मार्क क्युबन सारख्या अनेक गणनीय व्यक्तींचे कुतुहल जागृत केले. परंतु, मस्क DOGE चे समर्थन करेल व त्यात वाढ होईल या अंदाजाविपरित, कार्यक्रमानंतर हे क्रिप्टो 30% पेक्षा अधिक गडगडले आणि तेव्हा टेस्लाच्या सीइओने या कॉइनला “हसल/hustle म्हणजेच सावळागोंधळ” असे गंमतीने संबोधले. एलॉन मस्कच्या सॅटरडे नाइट लाइव्हमध्ये यजमानपदाच्या प्रयत्नांचा डोजकॉइनला थेट फायदा झाला नाही. परंतु त्या आधी अनेक आठवडे चाललेल्या तर्क-कुतर्कांनी लाखो लोकांचे ध्यान क्रिप्टोकरन्सीकडे नि:संशय आकर्षित केले. या मुळे आज उपभोगत असलेले महत्त्व डोजकॉइनला प्राप्त झाले.

Get WazirX News First

* indicates required

 डोगकॉइन ही लायक गुंतवणूक आहे का?

डोगकॉइनचा इतका गाजावाजा का केला जात आहे? डोगकॉइनचा प्रुफ-ऑफ-वर्क (कामाचा-पुरावा) प्रोटोकॉल बिटकॉइनपेक्षा अनेक प्रकारे वेगळा आहे. DOGE च्या अल्गॉरिदमममधे SCRYPT वापरले जाते आणि याचा परिणाम म्हणून बीटीसी पेक्षा अधिक वेगवान प्रक्रिया वेग या क्रिप्टो करन्सीने मिळवला आहे. या व्यतिरिक्त, या क्रिप्टोकरन्सीचा 1 मिनिट ब्लॉक टाइम आणि अमर्यादित एकूण पुरवठा आहे व याचा अर्थ आहे माइन करता येणार्‍या डोगकॉइन्सची मात्रा अमर्यादित आहे. याच्या परिणामस्वरूप, डोजकॉइन हे मूळत: चलनवृध्दीप्रवण कॉइन बनले आहे ज्यामुळे ते दीर्घकालासाठी गुंतवणूक करण्यासाठी पात्र ठरते आणि हे बिटकॉइनसारख्या क्रिप्टोजच्या बाबतीत शक्य नाही ज्यांचे मागणी स्तर वाढणारे आणि पुरवठा दर घटणारे आहेत. आणि एक व्यवहारक्षम चलन म्हणून त्याचा अंगिकार आणि एकरूपीकरण होण्यासाठी या घटकाची संभाव्य मदत होऊ शकते.

विस्तृत अंगिकारामुळे,त्याच्या सध्याच्या स्थितीपासून, नियमितपणे लाखो ग्राहकांना सेवा देणारे वास्तव डिजिटल चलन या दर्जा पर्यंत डोगकॉइन नि:संशयपणे प्रगती करेल आणि वरच्या स्तरातील कोट्यावधी गुंतवणूकदारांमध्ये डोगकॉइनची जी लोकप्रियता उपभोगत आहे ती सुध्दा विसरता येणार नाही. हे सर्व घटक ध्यानात घेऊन, डोगकॉइन ही खरोखरच एक लायक गुंतवणूक आहे. परंतु इतर कोणत्याही क्रिप्टोकरन्सी प्रमाणे, अस्थिरता आणि विस्फोटकता हे देखील जोखिमीचे लक्षणीय घटक आहेत याची ग्राहकांना जाणिव असणे आवश्यक आहे.आणि म्हणूनच क्रिप्टो खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या किंमती थोड्याश्या कमी होण्याची तुम्ही वाट पहावी अशी शिफारस सामान्यत: केली जाते.

भारतात डोजकॉइन कशा प्रकारे खरेदी करावे?

भारतात क्रिप्टोकरन्सीबद्दलचे नियमन अजूनतरी अस्पष्ट असले तरीही क्रिप्टो व्यापार आजपर्यतच्या सर्वात उच्च स्तरावर आहेत. बिटकॉइन, एथेर्युम ते काडनो, डोजकॉइन आणि इतर सर्वांचा व्यापार भारतीय करत आहेत. क्रिप्टोंचा व्यापार करता येईल अशी अनेक क्रिप्टो एक्स्चेंजेस (विनिमय केंद्रे) उपलब्ध असली तरीही, भारतात डोजकॉइन खरेदी करण्यासाठी तुम्ही सर्वात उत्तम जागा शोधत असाल तर तुमचे उत्तर वझिर एक्स WazirX हे आहे. 

डिजिटल संपत्तीचा व्यापार करण्यासाठी क्रिप्टो एक्स्चेंजेस हा सर्वात उत्तम पर्याय आहे कारण क्रिप्टो व्यापारासाठी अद्यापि कोणतीही मानकीकृत संरचना अस्तित्वात नाही. म्हणूनच एक प्रतिष्ठित व विश्वासपात्र एक्स्चेंज निवडणे महत्त्वाचे आहे. वझिरएक्सचा प्रचंड मोठा डेटा बेस असल्याने ते कॉइन्सचा व्यापार करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी क्रिप्टोकरन्सीजची विस्तृत श्रेणी देऊ करतात आणि यात त्यांचे स्वत:चे युटिलिटी टोकन-डब्लुआरएक्स टोकन समाविष्ट असते. अत्युच्च दर्जाची सुरक्षितता, विद्युतवेगाने होणारे व्यवहार आणि त्वरित केवायसी प्रणाली तसेच बहुविध प्लॅटफॉर्म्सची उपलब्धता या सर्व सोयींमुळे वझिरएक्स भारतातील सर्वात विश्वासप्राप्त क्रिप्टो एक्स्चेंज आहे यात मुळीच संशय नाही.

भारतात वझिरएक्स /WazirX कडून डोगकॉइन खरेदी करायचे असल्यास, सर्वप्रथम वझिरएक्स ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा किंवा ते वेब प्लॅटफॉर्मवर प्राप्त करा. या नंतर तुमचे खाते तुम्हाला तयार करायचे आहे. एकदा तुमची केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली की तुमच्या नोंदणीचे सत्यापन केले जाईल. या नंतर, तुमच्या बॅंकेचे तपशील तुम्ही भरायचे आहेत आणि पैसे जमा करायचे आहेत. एकदा हे पूर्ण झाले की भारतात अद्ययावत डोजकॉइन किंमती तपासण्याकरिता तुम्ही वझिरएक्स एक्सचेंज ला तुम्ही भेट देऊ शकता आणि त्यानुसार खरेदी करू किंवा विकू शकता. भारतात डोजकॉइन खरेदी करण्यासाठी तुम्हाला एवढेच करणे आवश्यक आहे.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply