Skip to main content

WazirX सह उभे करा – तुमचे स्वतःचे क्रिप्टो एक्स्चेंज कसे उभारावे?

By फेब्रुवारी 24, 2022मार्च 7th, 20223 minute read

प्रिय दोस्तांनो!

आमची नेहमी अशीच धारणा राहिली आहे की, प्रत्येकाने स्पर्धेच्या पलिकडे गेले पाहिजे आणि संपूर्ण समुदायाची समृद्धी होण्याच्या व त्याची प्रगती होण्याच्या दृष्टीने एकत्रितपणे काम केले पाहिजे. ‘लाकडाच्या मोळीची’ गोष्ट किंवा ‘एकीचे बळ मिळते फळ’ ही म्हण तुम्ही ऐकलेच असेल ना! या गोष्टी आपण लहानपणी ऐकलेल्या असतील, तरी त्यातून मिळालेली शिकवण आजही लागू पडते.

Get WazirX News First

* indicates required

ही मूलभूत तत्वे मनात बाळगत आम्ही काहीतरी नवीन घेऊन आलो आहोत! आपल्याला एक समुदाय म्हणजेच कम्युनिटी म्हणून प्रगती करायची आहे आणि त्यासाठी तुमचे सहकार्य मिळेल, अशी आमची आशा आहे.

नवीन काय आहे?

वेब ३ ची लाट आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. उद्योजकांची भावी पिढी या लाटेवर स्वार होण्यासाठी सुसज्ज असली पाहिजे आणि योग्य मार्गावर जाण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच WazirXने आमचा ‘BUIDL with WazirX’ म्हणजेच ‘WazirXसह उभारणी करा’ हा नवा प्रोजेक्ट लाँच केला आहे.

BUIDL With WazirX (WazirX सह उभारणी करा)हे काय आहे?

क्रिप्टो एक्स्चेंज उभारणे कठीण आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुमच्या भावना नक्कीच समजू शकतो. आम्ही याची माहिती कठीण प्रकारे घेतली असली तरी आम्हाला ही प्रक्रिया तुम्हाला सोपी करून सांगायची आहे. आमच्या बिल्ड वुइथ WazirX प्रोग्रॅमने तुम्ही WazirXचा उपयोग करून घेऊन तुमचे स्वतःचे क्रिप्टो एक्स्चेंज तयार करू शकता. यासाठी लागणारी टूल्स, मार्गदर्शन, आघाडीच्या एंजल/व्हीसी गुंतवणुकदारांशी जोडून देणे आणि बरेच काही आता तुमच्या बोटांच्या अग्रांवर उपलब्ध आहे.

WazirXसह कशी बांधणी करावी?

या प्रक्रियेमध्ये तीन पायऱ्या आहेत. तुमच्याकडे उत्तम क्रिप्टो एक्स्चेंज तयार करण्याची आयडिया आणि ते उभारण्याचे पॅशन असेल तर तुमचे विचार व निश्चय नक्की करा आणि :

पायरी १ : अॅप्लाय

प्रोग्रॅम अॅक्सेस करण्यासाठी तुमची माहिती भरून एक सोपा फॉर्म भरा

पायरी २ : HODL (एचओडीएल) (पुनरावलोकन आणि विश्लेषण)

आमच्या टीम्स तुमच्या अर्जाची पडताळणी करतील आणि त्याला मंजुरी मिळाल्यास तुमच्याशी संपर्क साधतील.

पायरी ३ : BUIDL 

चला, तुमचे स्वतःचे क्रिप्टो एक्स्चेंज एकत्रितपणे तयार करू या.

जेव्हा तुम्ही WazirXसह उभारता तेव्हा तुम्हाला काय मिळते?

तुम्ही तुमच्या कौशल्याचा वापर करा आणि आम्ही तुम्हाला आमचा अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मदत करू. म्हणजे, तुम्ही आमच्यासोबत ऑनबोर्ड झाल्यावर खालील लाभ तुम्ही घेऊ शकता :

  • लिक्विडिटी (रोकडसुलभता) : ३००+ सर्वोच्च लिक्विडिटी मार्केट्सची उपलब्धता मिळते
  • टेक इन्फ्रा : WazirXच्या संस्थात्मक एपीआयसह खरेदी/विक्री (BUY/SELL) ऑर्डर देण्यासाठी तुमच्या युझर्सना सक्षम करताना ऑर्डर बुकचा अॅक्सेस मिळतो.
  • पार्टनर नेटवर्क : फ्लॅट ऑन/ऑफ रॅम्पसाठी केवायसी/एएमएल पार्टनर्स तसेच बँकिंग भागीदारांशी परिचय करून मिळतो.
  • डोमेनबद्दलचे सखोल ज्ञान : WazirX इंजिनीअरिंग आणि ऑपरेशन्स टीमकडून कायम सहाय्य मिळते. तुम्हाला इंटिग्रेट करण्यासाठी आणि तुमचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी आमचे तज्ज्ञ तुमची मदत करतात.
  • कस्टडी : क्रिप्टो विथड्रॉवल आणि डिपॉझिट्ससाठी WazirXच्या या क्षेत्रातील आघाडीच्या कस्टडी व एक्स्चेंज पायाभूत सुविधांचा उपयोग करून घेता येतो.
  • अनुपालन : आमचे तज्ज्ञ तुम्हाला करप्रणाली व नियामक नियमांविषयी मार्गदर्शन करतात.
  • भांडवल उभारणी सहाय्य : हाय-परफॉर्मिंग (उच्च कामगिरी करणाऱ्या) प्रोजक्ट्समध्ये तुम्हाला एंजल/व्हीसी गुंतवणूकदारांचाही अॅक्सेस मिळतो.

तुमचा अर्ज सबमिट करा

ब्राउनी पॉइंट्स

  • तुम्ही ऑनबोर्ड झाल्यावर (अॅप्लिकेशनची निवड झाल्यावर) तुम्ही या अतिरिक्त लाभाचा लाभ घेऊ शकता : आम्ही तुमच्या डे 0 लिक्विडिटीला सीड करू.
  • तुम्ही फंड/ गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला या प्रवासात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही येथे डायरेक्ट मेसेज पाठवून येथे माझ्याशी संपर्क साधू शकता

आम्ही हे का करत आहोत?

जगाचे नेतृत्व करण्यासाठी, आम्हाला असे वाटते की भारताने वेब ३ साठी अधिक उभारणी केली पाहिजे. ही सुवर्णसंधी आहे आणि म्हणूनच WazirXमध्ये आम्ही तुम्हाला सहाय्य करू इच्छितो. वर नमूद केल्याप्रमाणे, भारतात #BuildForCrypto साठी स्पर्धा करण्यापेक्षा सहयोगाने काम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

म्हणून, चला येऊ द्या, दोस्तांनो! तुमचे बिलियन-डॉलर एक्स्चेंज आपण एकत्रितपणे उभारू या! लवकरच या नव्या जगात आपण भेटू या.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply