Skip to main content

वझिरएक्स मध्ये बँक खाते कसे जोडायचे आणि भारतीय रुपये कसे भरायचे (How to Add a Bank Account and Deposit INR on WazirX)

By डिसेंबर 21, 2021डिसेंबर 22nd, 20214 minute read

प्रिय मित्रांनो!

तुम्ही तुमच्या क्रिप्टो प्रवासासाठी वझिरएक्स चा विचार करत आहात याचा मला आनंद आहे. तुम्हाला कोणत्याही सहाय्याची गरज पडली तर आम्ही येथे आहोत याची कृपया खात्री बाळगा. तुम्हाला काही शंका असल्यास, आमचे गाइड्स वाचल्यानंतरही, तर तुम्ही नेहमीच, येथे आमच्याशी संपर्क साधू शकता.

Get WazirX News First

* indicates required

 वझिरएक्स गाइड्स 

  • वझिरएक्सवर खाते कसे उघडायचे?
  • वझिरएक्सवर केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची? 
  • वझिरएक्सवर बँक खाते कसे जोडायचे आणि भारतीय रुपये कसे भरायचे?
  • वझिरएक्सवर क्विकबाय फीचर वापरून क्रिप्टो कसे खरेदी करायचे?
  • वझिरएक्सवर क्रिप्टो कसे खरेदी करायचे आणि विकायचे? 
  • वझिरएक्सवर क्रिप्टो कसे जमा करायचे आणि काढून घ्यायचे?
  • वझिरएक्स ट्रेडिंग फी कशी मोजली जाते? 
  • स्टॉप-लिमिट ऑर्डर कशी द्यायची?
  • वझिरएक्सवर ट्रेडिंग रिपोर्ट कसा डाऊनलोड करायचा?
  • वझिरएक्स पीटूपी (P2P) कसे वापरायचे?
  • वझिरएक्स कन्व्हर्ट क्रिप्टो डस्ट फिचर कसे वापरायचे?
  • वझिरएक्स रेफरल फीचरचे लाभ काय आहेत?
  • अधिकृत वझिरएक्स चॅनेल कोणती आहेत आणि वझिरएक्स सपोर्टपर्यंत कसे पोहोचायचे?

वझिरएक्सवर बँक खाते कसे जोडायचे?

तुमचे वझिरएक्स खाते तयार केल्यानंतर आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमचे बँक खाते (आयएमपीएस व्यवहारांसाठी) आणि यूपीआय तपशील जोडू शकता. कृपया याची नोंद घ्या की, कोणताही क्रिप्टो व्यापार करण्यासाठी, तुम्हाला आधी तुमचे बँक तपशील जोडावे लागतील. मात्र, तुम्हाला जेव्हा कधी इच्छा असेल तेव्हा तुम्ही ते काढू शकता आणि नवीन तपशील जोडू शकता (जास्तीत जास्त 5 वेळा). जेव्हा नवीन खाते जोडले जाते तेव्हा, पडताळणी प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल. 

तसेच तुम्ही एकापेक्षा अधिक बँक खाती आणि यूपीआय आयडी जोडू शकता. त्यानंतर तुमच्या पसंतीप्रमाणे (पेमेंट पर्यायांमधून) डिफॉल्ट बँक/यूपीआय खाते निवडू शकता. 

महत्त्वाचे: भारतीय रुपयांच्या व्यवहारांमध्ये सुरळीत जमा करणे आणि काढून घेणे याचे सुलभीकरण करण्यासाठी, आम्ही बँक खाते आणि यूपीआय आयडीची पडताळणी करतो जेणेकरून बँकिंग व्यवहार एंडला अडकून पडणार नाहीत/अयशस्वी होणार नाहीत.

तुम्ही वझिरएक्सवर बँक खाते कसे जोडू शकता ते येथे दिले आहे:

पायरी 1: 

मोबाईल: ‘सेटिंग’ मेन्यूमध्ये, ‘बँकिंग अँड पेमेंट ऑप्शन्स’ निवडा.

वेब: खाली दिलेलया प्रतिमेतील ठळक केलेल्या आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर ‘अकाउंट सेटिंग्ज’वर. त्यानंतर ‘पेमेंट ऑप्शन्स’वर क्लिक करा.

पायरी 2 (मोबाईल आणि वेब): ‘बँक अकाउंट’अंतर्गत, ‘ॲड अ न्यू पेमेंट ऑप्शन’वर क्लिक करा. 

पायरी 3: विनंती केलेले तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा.

एकदा तुम्ही बँकेचे तपशील सबमिट केले की आमची टीम त्याची पडताळणी करेल. 

वझिरएक्सवर यूपीआय तपशील कसे जोडायचे?

पायरी 1 मोबाईल आणि वेब वापरकर्ते या दोहोंसाठी वर उल्लेख केल्याप्रमाणेच राहते. 

पायरी 2: ‘यूपीआय’अंतर्गत ‘ॲड अ न्यू पेमेंट ऑप्शन’वर क्लिक करा.

पायरी 3: विनंती केलेले तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा.

एकदा तुम्ही यूपीआयचे तपशील सबमिट केले की आमची टीम त्याची पडताळणी करेल. 

नोंद

  • तुम्ही तुमच्या वझिरएक्स खात्याला तुमचे बँक खाते जोडले की लगेचच बँक खाते आणि यूपीआय पडताळणी आपोआप केली जाते. 
  • कृपया तुम्ही तुमच्या नावावर असलेले केवळ बँक खाते आणि/किंवा यूपीआय आयडी जोडले आहे याची सुनिश्चिती करा. यशस्वी पडताळणीसाठी वझिरएक्स खात्यावरील नाव आणि बँक खात्यावरील नाव जुळले पाहिजे.

एकदा तुमचे तपशील पडताळले की, तुम्हाला तातडीने ईमेलद्वारा सूचित केले जाईल. 

वझिरएक्समध्ये भारतीय रुपये कसे भरायचे?

एकदा तुमचे बँक खाते पडताळले की तुम्ही तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये फंड (भारतीय रुपये) जमा करायला सुरुवात करू शकता. त्याबरोबरच, तुम्ही फक्त नेटबँकिंगद्वारेच नव्हे तर तुमच्या मोबीक्विक वॉलेटमधूनही तुमच्या वझिरएक्स खात्यात भारतीय रुपये भरू शकता.

तुम्ही या पायऱ्यांचे पालन करू शकता:

पायरी 1 (मोबाईल आणि वेब): वझिरएक्स ॲपवर फंड्सवर क्लिक करा. 

मोबाईल

वेब:

पायरी 2: ‘आयएनआर’ निवडा.

मोबाईल:

पायरी 3: डिपॉझिटवर क्लिक करा.

मोबाईल:

वेब:

पायरी 4: भारतीय रुपये भरण्यासाठी तुमच्या पसंतीचा मोड निवडा – इन्स्टंट डिपॉझिट (नेटबँकिंग) किंवा इन्स्टंट डिपॉझिट (वॉलेट ट्रान्सफर)

पायरी 5: फंड डिपॉझिट करा!

  • जर तुम्ही इन्स्टंट डिपॉझिट (नेटबँकिंग) पर्यायाद्वारे फंड जमा करण्याची निवड केली तर:
    • पायरी 1: तुम्हाला जमा करायची असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि कंटिन्यूवर क्लिक करा.
    • पायरी 2: तुम्हाला तुमच्या बँकेच्या नेटबँकिंग लॉगइन पेजवर पुनःनिर्देशित केले जाईल. नेटबँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा. यशस्वी लॉगइननंतर, तुम्ही व्यवहाराला मंजुरी देऊन पुढे जाऊ शकता.
    • कृपया याची नोंद घ्या
      • केवळ समर्थित बँकेच्या माध्यमातूनच नेटबँकिंग पर्यायाद्वारे फंड ट्रान्सफर करणे शक्य असते. तुम्ही येथे समर्थित बँकांची यादी शोधू शकता. आम्ही यामध्ये आणखी बँका जोडण्यावर काम करत आहोत आणि याबद्दल तुम्हाला कळवले जाईल. 
      • यशस्वी फंड ट्रान्सफरनंतर, डिपॉझिट तुमच्या वझिरएक्स खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा होण्यास 24 तासांपर्यंत लागू शकतात. बहुसंख्य फंड बऱ्याच कमी वेळात (अगदी 1 तासही) जमा होतात.  
  • जर तुम्हाला तुमच्या मोबीक्विक वॉलेटमधून फंड जमा करायचा असेल तर, इन्स्टंट डिपॉझिट (वॉलेट ट्रान्सफर) पर्याय निवडा. येथे:
    • पायरी 1: तुम्हाला जमा करायची असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि कंटिन्यू आणि त्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करा. 
    • पायरी 2: तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि ओटीपीची पुष्टी करा.
    • पायरी 3: आता तुम्हाला मोबीक्विक पेमेंट पेजवर पुनःनिर्दशित केले जाईल, जिथे तुमच्या वॉलेटमधील शिल्लक दिसत असेल. 
    • पायरी 4: व्यवहाराची प्रक्रिया करा, आणि तुमची ठेव जास्तीत जास्त 24 तासांमध्ये तुमच्या खात्यात दिसेल. 
    • कृपया याची नोंद घ्या:

व्यवहार सुरू करण्यापूर्वी तुमचे मोबीक्विक वॉलेट (फक्त यूपीआय/बँक खाते/डेबिट कार्ड वापरून) टॉप-अप करणे महत्त्वाचे असते. क्रेडिट कार्डद्वारा वॉलेट टॉप-अपला समर्थन मिळत नाही.

लक्षात ठेवण्याचे मुद्दे 

  • अशा घटना घडू शकतात जिथे तुमचे भारतीय रुपयांमधील ठेवी तुमच्या वझिरएक्स खात्यामध्ये दिसण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. कृपया याची खात्री बाळगा की तुम्ही हे फंड गमावणार नाही. आमचे ट्रॅक रेकॉर्ड आहे: नोंदवलेल्या 100% प्रकरणांमध्ये, वापरकर्त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत (त्यांच्या वझिरएक्स खात्यात किंवा बँक खात्यात). वझिरएक्स केवळ डिपॉझिट शुल्क आकारते आणि बाकी काही ठेवत नाही. 
  • तुमच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्या सोडवल्या नाहीत तर (7 कामकाजाच्या दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित), तर तुम्ही येथे थेट आमच्या समर्पित सहाय्य टीमशी संपर्क साधू शकता.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

मी माझ्या वझिरएक्स वॉलेटमध्ये फंड जमा का करू शकत नाही?

यामागे अनेक कारणे असू शकतात. तुम्ही फंड भरू शकत नाही कारण बहुधा:

  • जोडलेल्या बँकेचा खाते क्रमांक किंवा IFSC चुकीचा असू शकतो. 
  • बँक तपशील अचूक असले तर नावात फरक आहे. याचा अर्थ वझिरएक्सवर नोंदवलेले तुमचे नाव आणि बँक खात्यावरील नाव जुळत नाही. 
  • तुम्ही फंड जमा करण्यासाठी तुमचे पडताळणी केलेले बँक खाते वापरत नाही आहात.
  • बँकेचे खाते समर्थित बँकेचे नाही. 
  • बँकेच्या साईटवर प्रविष्ट केलेले लॉगइन तपशील अचूक नाही.
  • प्लॅटफॉर्मच्या मेन्टेनन्सचे काम सुरू आहे. जेव्हा मेन्टेनन्सचे वेळापत्रक असेल तेव्हा आम्ही आमच्या वापरकर्त्यांना सूचित करतो.

पेमेंट तपशील (बँक खाते आणि यूपीआय) दुसऱ्याचे असू शकतात का?

नाही. बँक आणि यूपीआय खाते तुमच्याच नावावर असले पाहिजे. मात्र तुम्ही संयुक्त खातेदार असू शकता. 

डिपॉझिट शुल्क आहे का?

हो! तातडीने फंड जमा करणे सुलभ करण्यासाठी, आम्ही पेमेंट प्रोसेसर वापरतो जेणएकरून खात्यांमध्ये जवळपास तातडीने रकमा जमा होतात. निरनिराळ्या पेमेंट मोडसाठी डिपॉझिट शुल्क निरनिराळे असते आणि ते आयएनआर डिपॉझिट पेजवर दाखवलेले आहे. डिपॉझिट शुल्कात सर्व कर समाविष्ट असतात. 

किमान/कमाल भारतीय रुपये जमा करण्याची मर्यादा आहे का

हो! तुम्ही प्रत्येक डिपॉझिट व्यवहारात नेटबँकिंगद्वारे किमान ₹100 आणि कमाल ₹4.99 लाखापर्यंत जमा करू शकता. मात्र, तुम्ही एका दिवसात अनेक व्यवहार करू शकता – यासाठी कोणतीही कमाल मर्यादा लागू होत नाही!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply