Skip to main content

सन 2021 मध्ये भारतात बिटकॉइन कसे खरेदी करावे?(How to Buy Bitcoin in India in 2021)

By डिसेंबर 21, 20215 minute read

संपूर्ण जगास अनपेक्षित व अभूतपूर्व कोविड-19 चा तडाखा बसला आणि संपूर्ण जगभरातील आर्थिक बाजारपेठा कोसळल्या, त्याच वेळेस गुंतवणूकदारांसाठी अत्यंत हवीहवीशी पर्यायी गुंतवणूक म्हणून बिटकॉइन उदयास आले.

जवळ-जवळ स्थिर व चांगल्या परताव्यांमुळे, दररोज भारतातील अधिकाधिक व्यापारी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आणि दिवसेंदिवस, बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे जवळजवळ विनासायास होत चालले आहे – विशेषत: क्रिप्टो देवाणघेवाणीने ज्यातून व्यापारी भारतात बिटकॉइनची विक्री आणि खरेदी करू शकतात; भारत 2021 मध्ये बिटकॉइन खरेदी करण्याचा सोपा मार्ग तुम्हाला हवा असेल तर क्रिप्टो बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी ही नक्कीच उत्तम वेळ आहे.

या पोस्टमध्ये, भारत 2021 मध्ये बिटकॉइनमध्ये तुम्ही कशा प्रकारे गुंतवणूक करू शकता या बद्दल आम्ही सर्व माहिती देणार आहोत!

Get WazirX News First

* indicates required

बिटकॉइन म्हणजे काय?

बिटकॉइन हे विकेंद्रित डिजीटल चलन आहे जे बॅंकेसारख्या मध्यस्थांचा वापर न करता विकत घेता, विकता आणि बदलता येते.

रहस्यमय सातोशी नाकामोटोने 2009 साली सर्वप्रथम आणलेले बिटकॉइन ही आजवर अस्तित्वात असणारी पहिली क्रिप्टोकरन्सी विस्तृतपणे मानली जाते. बिटकॉइन हे विनिमयाची पद्धत म्हणजेच एक चलन व मूल्याचा संग्रह किंवा एक पर्यायी गुंतवणूक असे दोन्ही आहे.

बहुतेक क्रिप्टोकरन्सींप्रमाणेच, बिटकॉइन हे विकेंद्रित आभासी चलन आहे आणि त्याची मालकी करता येत नाही किंवा एका केंद्रिय व्यक्ती किंवा संस्थेकडून त्याचे नियंत्रण करता येत नाही.

भारतात बिटकॉइनमध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करायची?

संपूर्ण जगभर संपत्तीच्या एका नव्या श्रेणीतील गुंतवणूकदारांना बिटकॉइनने जन्म दिला आहे ज्यांना खालील गोष्टीत आकर्षण आहे: परंतु तुम्ही विचारत आहात की विशेषत: भारतात बिटकॉइन का खरेदी करायचे व विकायचे? असे आहे, ते उच्च परतावा देते ही वस्तुस्थिती आहे आणि आजमितीस संपूर्ण जगातील ही सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारी संपत्ती आहे. 

बिटकॉइनच्या किंमतीतील वारंवार चढउतार, जोखीम पत्करण्यास तयार असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या गुंतवणूकीवर त्वरित आणि उच्च परतावा हव्या असणाऱ्या व्यापाऱ्यासाठी ही चांगली गुंतवणूक ठरते. 

महामारीच्या काळात हे नमूद करण्यासारखे आहे की, जसजसे अधिकाधिक गुंतवणूकदारांनी त्याकडे लक्ष दिले आणि या संपत्ती श्रेणीवर विश्वास दाखवला तसतशी बिटकॉइनची किंमत वाढत गेली. सन 2020च्या अखेरीस त्याची किंमत जवळजवळ $30,000 पर्यंत गगनाला जाऊन भिडली होती. 

एप्रिल 2021 पर्यंत, बिटकॉइनची किंमत $53,000 पेक्षा थोडीशी जास्त – भारतातील बिटकॉइनची किंमत अंदाजे रु 40 लाख आहे. आणि सन 2021 साठी बिटकॉइनच्या किंमतीच्या भाकितानुसार,  सन 2021 च्या अखेरीपर्यंत ती $400,000 पर्यंत वाढेल असा अंदाज आहे!या शिवाय, बिटकॉइन चलनघटीची संपत्ती (डिफ्लेशनरी असेट) म्हणून विकसित करण्यात आल्याने, त्याच्या पुरवठ्यावर 2.10 कोटींची मर्यादा घालण्यात आली आहे. त्याचा मर्यादित पुरवठा आणि बिटकॉइनमध्ये निम्म्याने कपात , या दोन्हीच्या मध्ये, बिटकॉइन गुंतवणूकदारांना चलनवाढीविरुद्ध बचाव देऊ करते. 

भारतात बिटकॉइन कसे खरेदी करावे?

भारतात बिटकॉइन खरेदी करण्याचे अनेक मार्ग आहेत. सुरुवात करण्यासाठी, क्रिप्टोकरन्सीच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून तुम्ही भारतात क्रिप्टोकरन्सी विकत घेऊ आणि विकू शकता. नवख्या व्यक्तीच्या माहितीसाठी, तुम्हाला क्रिप्टोकरन्सींमध्ये व्यवहार करता येण्यासाठी क्रिप्टोकरन्सी हा एक आभासी प्लॅटफॉर आहे. स्टॉक एक्सचेंजपेक्षा क्रिप्टो एक्सचेंज फारसा वेगळा नाही, फक्त तो डिजीटल, स्व-नियमनित आणि संपूर्ण वर्षभर 24/7 कार्यरत असतो.

भारतात बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुमच्यासाठी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज हा सर्वात सोपा मार्ग आहे परंतु इतर काही प्रकार देखील निश्चितच आहेत. उदा, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आकारत असलेले व्यवहार शुल्क देण्याचे तुम्हाला टाळायचे असेल किंवा समोरच्या पक्षाशी थेट व्यवहार करायचा असेल तर तुम्ही P2P, किंवा व्यक्ती-ते-व्यक्ती क्रिप्टो व्यवहाराची निवड करू शकता.

या बाबतीत, क्रिप्टो एक्सचेंज तरीही संलग्न असू शकते परंतु ते सुविधादाता म्हणून काम करेल. तुमच्याशी व्यवहार करण्यासाठी विक्रेता/खरेदीदार शोधण्याचे काम सामान्यत: प्लॅटफॉर्म करतो. तथापि, ही पद्धत एका बिटकॉइन एक्सचेंजच्या माध्यमातून भारतात नुसते बिटकॉइन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या वेळापेक्षा बराच जास्त वेळ घेते कारण तुमच्या व्यवहाराशी जुळणारा विक्रेता किंवा खरेदीदार शोधणे खूप लांबलचक प्रक्रिया असू शकते. शेवटी, बक्षिस म्हणून नवीन मिंटेड कॉइन कमावण्यासाठी तुम्ही बिटकॉइन थेट माइन करू शकता. लक्षात असू द्या, बिटकॉइन मायनिंग ही खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे विशेष हार्डवेअर व सॉफ्टवेअर बरोबरच महाग मायनिंग साधन असावे लागते. 

Get WazirX News First

* indicates required

भारतात चांगले बिटकॉइन एस्चेंज कसे निवडावे?

बिटकॉइन एक्सचेंजमधून तुम्ही गुंतवणूक करत असाल तर भारतात बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक्सचेंज निवडण्यापूर्वी प्लॅटफॉर्म व त्यामागील टीम यांचे सखोल संशोधन करण्याची खात्री करा. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्लॅटफॉर्म खालील गोष्टी उपलब्ध करून देत आहे याची देखील तुम्ही खात्री केली पाहिजे.

  1. सर्वप्रथम, एक्सेंजच्या वेबसाइटला साधे युजर इंटरफेस आहे आणि ते वापरण्यास सोपे आहे याची नक्की खात्री करा.
  2. आता ते एक्सचेंज बिटकॉइन ट्रेडिंग पेअर्सचे समर्थन करते का ते तपासा.
  3. भारतात बिटकॉइन खरेदी व विकण्यापूर्वी विश्लेषण करण्याचा महत्त्वाचा घटक सुरक्षितता हा आहे. केवायसी प्रोटोकॉल अस्तित्वात नसलेल्या एक्सचेंजपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा 

सरतेशेवटी, कोणता प्लॅटफॉर्म एका रास्त व्यापार शुल्कास तुम्हाला बिटकॉन विकत देतो त्यासाठी काही एक्सचेंजची तुलना करा. 

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतात बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करा

बिटकॉइन व्यवहारांची सुविधा देणारी अनेक भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहेत. भारत 2021 मध्ये बिटकॉइन विकत घेण्याच्या मार्गासाठी, तुमच्या निवडीच्या एक्सचेंजमध्ये तुम्हाला व्यापारी खाते उघडायचे आहे आणि त्यांच्या केवायसी प्रक्रियेतून जायचे आहे एवढेच. एकदा तुमची नोंदणी झाली की तुमच्या वैयक्तिक किंवा प्लॅटफॉर्म विशिष्ट वॉलेटमध्ये (तुम्ही निवडलेल्या एक्सचेंजनुसार) तुम्हाला पैसे जमा करता येतील व भारतातील बिटकॉइन किंमतीनुसार बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करता येईल. 

वझिरएक्सद्वारे भारतात बिटकॉइनमध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करता येते?

वझिरएक्सद्वारे, भारतात बिटकॉइन खरेदी करण्याचा सोपा मार्ग तुम्हाला सापडेल. तुम्हाला फक्त खालील पायऱ्यांचे पालन करावयाचे आहे:

1. एक वझिरएक्स खाते उघडा:

  • वझिरएक्स वेबसाइटवर जा आणि साइन अप बटनावर क्लिक करा.
  • तुमचा ईमेल पत्ता द्या आणि एक अभेद्य पासवर्ड तयार करा.

वझिरएक्स सेवेच्या अटी वाचा, आणि मग त्या अटी तुम्हाला अनुकूल वाटत असतील तर चेकबॉक्समध्ये क्लिक करा.

Signup to WazirX
  • पूर्ण करण्यासाठी साइन अपवर क्लिक करा.
  • आता सत्यापन मेलसाठी तुमची ईमेल इनबॉक्स तपासा आणि साइन अप प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या ईमेलवर ईमेलचे सत्यापन करा पर्यायावर टॅप करा.
Signup to WazirX
  • केवायसी प्रक्रियेसाठी दिलेल्या पर्यायांच्या सूचीतून तुमचा देश निवडा.
  • आता तुम्हाला केवायसी सत्यापन करण्यास सांगितले जाईल.
Signup to WazirX

आता तुम्ही तुमची खाते तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे!

2. पैसे जमा करा:

दोन पर्यायांद्वारे तुम्ही वझिरएक्समध्ये भारतीय रुपये जमा करू शकता:

3. बिटकॉइन खरेदी करा:

  • बिटकॉइनची अद्ययावत किंमत जाणून घेण्यासाठी एक्सचेंजला भेट द्या.
Bitcoin Latest Price- WazirX
  • तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर खाली स्क्रोल करून खरेदीविक्री पर्याय शोधू शकता.
  • खरेदी निवडल्यानंतर, तुमच्या इच्छेची भारतीय रुपयातील किंमत आणि तुम्हाला खरेदी करावयाच्या बिटकॉइनची रक्कम भरा.
Bitcoin Convertor - WazirX
  • खरेदी ऑर्डर ठेवा/Place Buy Orderक्लिक करा आणि ऑर्डर होण्याची नुसती प्रतीक्षा करा.

आणि आता ते पूर्ण झाले! व्यवहार पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये बिटकॉइन जोडलेली दिसतील.

भारतातील बिटकॉइनची खरेदी: नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. भारतात बिटकॉइन खरेदीसाठी आवश्यक किमान रक्कम किती आहे?

मे 2021 मध्ये भारतातील बिटकॉइनची किंमत जवळजवळ रु. 40 लाख होती. जवळजवळ दर सेकंदास किंमत वरखाली होते. अगदी रु 100 इतक्या कमी किंमतीचा बिटकॉनचा एक अंशदेखील तुम्ही विकत घेऊ शकता. 

2. बिटकॉइन विकत घेणे भारतात कायदेशीर आहे का?

आता पर्यंत, भारतातील कोणत्याही केंद्रिय प्राधिकरणाने बिटकॉइन अधिकृत केलेले नाही किंवा त्याचे नियमन केलेले नाही. बिटकॉइनच्या व्यापाराशी संबंधित कोणतीही निश्चित नियम, नियमने किंवा मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. म्हणूनच, भारतात बिटकॉइन खरेदी करणे बेकायदेशीर आहे असे म्हणता येत नाही. 

3. माझे बिटकॉइन सुरक्षितपणे ठेवले आहे याची खात्री मला कशा प्रकारे करता येईल?

भारतात तुम्ही बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, तुम्ही ती बिटकॉइन वॉलेटमध्ये ठेवू शकता – हे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहेत जे वापरून वापरकर्ते बिटकॉइन ठेवू शकतात किंवा त्यांचा व्यापार करू शकतात. बिटकॉइन वॉलेटसंबंधी अधिक तपशीलवार जाणून घेण्यासाठीबिटकॉइन वॉलेट मार्गदर्शिकावाचा

4. भारतात बिटकॉइन खरेदी करण्यासाठी कायदेसंलग्न प्रणाली काय आहेत?

सर्वप्रथम, तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी, तुमचे पॅन कार्ड व पत्त्याचा वैध पुरावा असला पाहिजे. एकदा तुमचे बॅंक खाते एक्सचेंज खात्याशी जोडले गेले आणि सत्यापन प्रक्रिया पूर्ण झाली की भारतात बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास तुम्ही पात्र झाला आहात!

5. बिटकॉइन वॉलेट कसे सेट अप करायचे?

बिटकॉइन संग्रहित करण्यात व विकण्यात मदत करण्यासाठी तुम्ही वापरता तो एक्सचेंज प्लॅटफॉर्म, सामान्यत: एक बिटकॉइन वॉलेट, तुम्हाला उपलब्ध करून देतो. तुम्ही साइन इन करता आणि तुमचे खाते उघडता तेव्हा एक वॉलेट आपोआप सेट अप केले जाते.

6. बिटकॉइनचे इतर समकक्ष कोणते आहेत?

तुम्ही गुंतवणूक करू शकाल अशा बिटकॉइनसारख्या  क्रिप्टोकनसीज, इथेरियम, लाइटकॉइन व रिपल या आहेत. 

भारत 2021 मध्ये बिटकॉइन कशा प्रकारे विकत घेता येईल हे जाणून घेण्यासाठी बनवलेली ही मार्गदर्शिका तुम्हाला माहितीपर वाटली असेल अशी आमची आशा आहे! व्यापाराचा आनंद घ्या!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply