Skip to main content

भारतामध्ये क्रिप्टो नोकरी कशी मिळवावी (How to Get a Crypto Job in India)

By डिसेंबर 1, 2021डिसेंबर 21st, 20214 minute read

गेल्या वर्षीच्या महामारीदरम्यान, भारताच्या शहरी भागातील बेरोजगारी जवळपास 20% नी वाढली. बंद पडलेली दुकाने, कार्यालये, मजुरी कामाचा अभाव यांनी आकडेवारी वाढली. मात्र, क्रिप्टो मार्केट यापासून दूर राहिले.

जवळपास दर तीन महिन्यांनी वाढ होत असलेले क्रिप्टो मार्केट हे अजिबात नुकसान न झालेल्या मोजक्या काही क्षेत्रांपैकी एक होते. त्याऐवजी, ते अगदी जागतिक पातळीवरही वाढले. आता उद्योगात वाढ होत असताना, मागणी वाढल्यानंतर त्यापाठोपाठ अधिक रोजगारनिर्मिती होते, म्हणजे नोकऱ्या. 

क्रिप्टोमधील करिअरनी भारतामध्ये बरेच यश आणि वाढ पाहिली आहे. जर तुम्ही भारतात क्रिप्टो करिअरच्या शोधात असाल तर, ते मिळण्यापूर्वी ही पोस्ट हा तुमचा अंतिम थांबा आहे. नोकऱ्यांच्या प्रकारापासून तुम्हाला एखादी नोकरी कशी मिळेल इथपर्यंत, आम्ही भारतातील क्रिप्टो नोकरी शोधण्याबद्दल आणि मिळवण्याबद्दल सर्व बाबी विचारात घेऊ.

क्रिप्टो वर्तुळातील नोकऱ्यांचे प्रकार 

क्रिप्टो स्पेसमधील करिअरचा यूएसपी हा आहे की, ते खूप वैविध्यपूर्ण आहेत. क्रिप्टो नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानात कुशल असण्याची गरज नाही.

डेटा सायन्टिस्ट (Data Scientist) 

या घडीला क्रिप्टो उद्योगातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्यांपैकी एक म्हणजे डेटा सायन्टिस्ट. 

डेटा सायन्टिस्ट फिल्टर न केलेल्या अफाट डेटामधून कृती करण्यायोग्य इनसाइट तयार करतात आणि, त्यातून सोल्यूशन विकसित करतात. मशीन लर्निंगसारखे अनेक साधने व कौशल्ये असे इनसाइट प्राप्त करण्यात मदत करतात.

Get WazirX News First

* indicates required

तुम्हाला अखेरच्या ओळीत संयम जोडावासा वाटू शकतो.

हे इनसाइट एकदा मिळवले की ते भागधारकांकडे अग्रेषित केले जातात, जे फर्मना निर्णायक निर्णय घेण्यात मदत करतात.

ब्लॉकचेन डेव्हलपर (Blockchain Developer) 

ब्लॉकचेन विकसनामध्ये दोन ठळक कामे असतात. 

यामध्ये ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि कोअर ब्लॉकचेन डेव्हलपर असतात, दोघांच्याही कामाचे स्वरूप भिन्न असते. 

ब्लॉकचेन प्रणालीचे आर्किटेक्चर विकसित करण्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी कोअर डेव्हलपरवर असते. 

दुसऱ्या बाजूला, सॉफ्टवेअर डेव्हलपर विकेंद्रित अॅप्लिकेशन/स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट तयार करतो, त्यावर देखरेख करतो आणि ते उद्दिष्टानुसार काम करतील याची खबरदारी घेतो. तुम्हाला ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणून स्वतःचे करिअर सुरू करायचे असेल तर, भारताच्या क्रिप्टो एक्सचेंजपैकी एक, वझिरएक्सकडे यासाठी जागा भरायच्या आहेत.

तुम्हाला या नोकरीसाठी यापैकी काही कौशल्यांची गरज असू शकते: 

  • क्रिप्टोग्राफी 
  • स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि डेटा स्टक्चरचे ज्ञान
  • ब्लॉकचेन आर्किटेक्चरची समज 
  • वेब डेव्हलपमेंट 

क्रिप्टो मार्केट विश्लेषक (Crypto Market Analyst) 

कंपन्या वाढत्या प्रमाणात क्रिप्टो कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना नोकरी देण्यासाठी प्राधान्य देत आहेत. व्यवसायातील कामकाज सुधारण्यासाठी क्रिप्टो क्षेत्रातील कौशल्य असलेल्या लोकांना चांगली मागणी आहे. 

क्रिप्टो विश्लेषक नेमके तेच करतात. इनसाइटचे विश्लेषण करणे, देणे, संशोधन करणे, भाकित करणे, मार्केट ट्रेंड, मागणी, किंमती आणि इतर अनेक गोष्टींवर देखरेख ठेवणे याची जबाबदारी त्यांच्यावर असते.  या कामासाठी ग्राहक आणि गुंतवणूकदारांना तंत्र आणि योग्य तारतम्याचा वापर करून गुंतवणूक निर्देश देणे आणि गुंतवणूक संधींची शिफारस करणे यासारख्या क्षमता आवश्यक असतात.

ग्राहक सहाय्य एक्झिक्युटिव्ह (Customer Support executive)

चांगल्या ग्राहक सहाय्याशिवाय कोणताही व्यवसाय चांगली कामगिरी करू शकणार नाही. दररोज अधिकाधिक ग्राहकांसह वाढणारा उद्योग म्हणून, ग्राहक सहाय्याच्या कामाची अतिशय गरज असणे नैसर्गिकच आहे. 

आपल्याला माहित आहे त्यानुसार, क्रिप्टो एकाच वेळी हजारो ग्राहकांबरोबर ऑनलाईन फंक्शन एक्सचेंज करते. भरपूर संख्येने ग्राहक आणि त्यांच्या शंका हाताळणे हा या नोकरीचा मूलभूत भाग आहे.

त्याचप्रमाणे, या कामासाठी नातेसंबंध हाताळणे आणि ते दृढ करणे, समुदायांच्या संपर्कात राहणे आणि प्रेक्षकांचे अज्ञान दूर करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे यासाठीचे कौशल्य आवश्यक असते. 

एकूणच, भरती केलेले कर्मचारी कोणत्याही शंका दूर करताना ग्राहकांना चांगला अनुभव येईल याची सुनिश्चिती करतील. वझिरएक्ससारख्या क्रिप्टो एक्सचेंजने त्यांच्या युजर बेसचा आनंद विचारात घेतला आहे आणि त्यांच्याकडे सध्या ग्राहक सहाय्यासाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. 

क्रिप्टो मार्केटिंग (Crypto Marketing)

कोणत्याही व्यवसायाच्या अगदी आरंभापासून आणि त्यानंतर संपूर्ण जीवनकालात मार्केटिंग हा महत्त्वाचा भाग आहे. मार्केटिंग केवळ ग्राहक संख्या वाढवण्यात आणि उत्पादनाबद्दल जनजागृती करण्यात मदत करत नाही, तर स्पर्धेला तोंड देण्याचे आणि उत्पादने व सेवा सुधारण्याचे साधन म्हणूनही काम करते. 

क्रिप्टो वर्तुळात, हा उद्योग अद्याप बाल्यावस्थेत असल्यामुळे, त्याचे सर्व प्रकारांमध्ये आणि भूमिकांमध्ये मार्केटिंग करणे, हे अधिकच महत्त्वाचे बनते आणि त्याला सर्व प्रचार आणि लक्ष्य समुदायाचे लक्ष आवश्यक असते. 

उदाहरणार्थ, मार्केटिंग करणारे कॅम्पेनचे डिझाईन करू शकतात आणि बाजारपेठ विस्तारण्यासाठी एनफएटी (NFT), ईटीएफ (ETF) सारखी विशिष्ट उत्पादने लाँच करण्यात मदत करू शकतात. संभाव्य वापरकर्ते ओळखून आणि ट्रेंडवर लक्ष ठेवून मार्केटिंग करणारे जास्तीत जास्त नफा आणि बाजारपेठेचा हिस्सा कमावण्यासाठी धोरणे विकसित करू शकतात. 

फायनान्स एक्झिक्युटिव्ह (Finance executive)

तंत्रज्ञानावर अवलंबून नसलेल्या मोजक्या नोकऱ्यांपैकी एक असलेल्या वित्तीय क्षेत्रात तुम्हाला अनेक पदांसाठी प्रयत्न करता येतात. 

त्यामध्ये समावेश असलेले त्यापैकी काही:

  • गुंतवणूक विश्लेषक 
  • जोखीम विश्लेषक 
  • उद्यम भांडवल विश्लेषक 
  • फायनान्स रिसर्च इंजीनिअर 
  • बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यात जोखीम आहे, आणि फर्मना फायनान्स तज्ज्ञापेक्षा कोणीही अधिक चांगल्या प्रकारे समाजवून सांगू शकत नाही. क्रिप्टोंमध्ये गुंतवणूक करणे असो किंवा गुंतवणूकदारांना सल्ला देणे असो, या क्रिप्टो नोकरी क्षेत्रासाठी व्याप्ती बऱ्यापैकी मोठी आहे. 

वरील यादीदेखील पूर्ण नाही, आणि आमच्यावर विश्वास ठेवा, क्रिप्टोमध्ये फायनान्स नोकऱ्यांचा शोध घेण्यासाठी आणखी बरेच काही आहे.

भारतामध्ये क्रिप्टो नोकरी कशी मिळवावी? 

भारतामध्ये क्रिप्टो नोकरी मिळवणे अवघड नाही. इंटरनेटच्या मेहेरबानीमुळे, गुगल, लिंक्डइन किंवा naukri.com सारख्या इतर करिअर प्लॅटफॉर्मवर साधे सर्च करणे भारतीयांसाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला अँजेलसारख्या इतर निशे प्लॅटफॉर्मवर, जिथे स्टार्टअप अनेकदा चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांसाठी लिस्ट करतात, तपास करणेही फायद्याचे ठरू शकते. 

क्रिप्टो उद्यासाठी काम करण्याचा आणखी एक लाभ म्हणजे सामान्यतः प्रस्थापित उद्योगांच्या तुलनेत कौशल्ये किंवा पात्रतेसंबंधी लवचिकता. क्रिप्टो उद्योग केवळ 12 वर्षांपासूनच अस्तित्वात आहे, आणि तो अजूनही वाढत आहे. 

तुमच्‍या नियोक्‍त्यांना कदाचित त्‍यांनी केलेल्या नोकरीच्या वर्णनांमध्ये नेमके बसणारे कर्मचारी सापडणार नाहीत. जास्तीत जास्त, ते कदाचित या क्षेत्रामध्येही अननुभवी होते पण ते शिकले आणि अखेरीस यशस्वी झाले. जोपर्यंत तुमच्याकडे चांगला दृष्टीकोन आहे आणि दररोज शिकण्याची तयारी आहे, तोपर्यंत क्रिप्टोकरन्सीमधील नोकरी तुमच्यापासून दूर असणार नाही. तुम्ही या उद्योगासाठी अर्ज करणार असाल तर हे दोन गुण असणे आवश्यक आहे. तुम्हाला ताळेबंद म्हणजे काय हे माहित नसेल तर तुम्ही फायनान्समध्ये नोकरी मिळण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. 

निष्कर्ष 

समारोप करण्यासाठी, सध्या भारतात अनेक क्रिप्टो नोकऱ्या आहेत. तसेच अनेक पदांसाठी प्रोग्रामिंग किंवा कोडिंग कौशल्याची गरज नाही. हा नवीन उद्योग उदयाला आल्यापासून, त्यामध्ये संधींचा स्फोट होत आहे. क्रिप्टो तज्ज्ञ असणे आवश्यक नाही. मात्र, तुम्ही तुमच्या क्षेत्रातील काही मूलभूत गोष्टी शिकल्या तर ते सर्वात चांगले राहील. 

एकूणच, जर तुम्हाला ब्लॉकचे तंत्रज्ञानामध्ये रस असेल आणि त्यामध्ये योगदान देता येत असेल तर फर्म तुम्हाला योग्य कामासाठी लगेचच नोकरी देऊ शकतात. क्रिप्टो नोकऱ्यांचा सर्वोत्तम भाग म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमीच्या फारशा सीमा नाहीत तर तुम्ही किती चांगली कामगिरी करू शकतता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या क्रिप्टो नोकरीसाठी अर्ज करत आहात? आम्हाला खालील कमेंटमध्ये सांगा!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply