Skip to main content

आढाव्याचा महिना – एप्रिल 2022 (Month in Review – April 2022)

By मे 2, 2022मे 26th, 20222 minute read
Month in Review - April 2022

नमस्ते मित्रांनो! एप्रिलमध्ये WazirX मध्ये काय काय झाले त्याचा अहवाल प्रस्तुत आहे.

मागील महिन्यात काय घडले?

[पूर्ण झाल्या] 17 नवीन मार्केट जोड्या: मागील महिन्यात आम्ही आमच्या यूएसडीटी मार्केटमध्ये 13 आणि आयएनआर मार्केटमध्ये 4 टोकनचा समावेश केला! तुम्हाला आता एपीई, ओएक्सटी, ओएक्सटी, डब्ल्यूओओ, केडीए, एमयूएलटीआय, आयडीईएक्स, एसीए, जेओई, एमसी, एनएएस, एएलसीएक्स, एचआयजीएच, आरएनडीआर, पीएलए, एफओआर, जीएमटी आणि बीएनएक्स यांची खरेदी, विक्री आणि व्यापार WazirX वर करता येईल. तुमच्या आवडत्या जोड्यांचे ट्रेडिंग आता सुरू करा, इथे!

[पूर्ण केले] अॅपवरकिंमतीविषयी सूचना देणारे वैशिष्ट्य: WazirX ने नेहमीच आपल्या वापरकर्त्यांना आपल्या सर्व प्लॅटफॉर्मवर सर्वोत्कृष्ट दर्जाचे अनुभव प्रदान करता यावे म्हणून काम केले आहे. त्यामुळे, वापरकर्त्याच्या गरजा आणि प्राधान्ये लक्षात घेऊन आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की यापुढे आमचे वापरकर्ते त्यांच्या आवडत्या कॉइन्स/टोकन्ससाठी WazirX अॅपवरच  ‘प्राइस अलर्ट’ सक्षम करू शकतात! इथे त्याविषयी आणखी जाणून घ्या. 

आम्ही काय निर्माण करत आहोत?

[सुरू आहे] एएमएम प्रोटोकॉल: आमचे डीईएक्स ज्यावर अवलंबून आहे अशा काही प्रोटोकॉल्समध्ये अनपेक्षित विलंब झाला आहे. त्यामुळे आम्हाला लाईव्ह सेवा सुरु करण्यात अडथळे येत आहेत. सध्या हे कधीपर्यंत मिळेल त्याचे ईटीए आमच्याकडे नाही. ही प्रक्रिया जलद व्हावी म्हणून आम्ही प्रोटोकॉल टीमबरोबर खूप मेहनत घेत आहोत याबद्दल निःशंक रहा.

Get WazirX News First

* indicates required

[सुरू आहे] नवीन टोकन्स: येत्या काही आठवड्यांमध्ये आम्ही WazirX वर आणखी टोकन्स सूचीबद्ध करू. तुमच्या त्याबद्दल काही सूचना आहेत का? कृपया आम्हाला @WazirXIndia इथे ट्विट करून कळवा.

काही ठळक मुद्दे

  • WazirX, बिल्डर्स ट्राइब आणि अटल इनक्युबेशन सेंटर यांनी गोव्यात वेब3 स्टार्टअप्सकरता ब्लॉकचेन पार्क उभारण्यासाठी भागीदारी केली आहे. इथे त्याबद्दल आणखी जाणून घ्या.
  • आम्ही झी बिझनेसबरोबर एक भविष्यकेन्द्री भागीदारी केली आहे. हा सहयोग दीर्घकालीन आणि फलदायी ठरेल अशी आम्हाला आशा आहे.

आमच्यासाठी हा एक सफल महिना होता. खूप आशा आणि सकारात्मकतेने आम्ही मे 2022 ची वाट पाहत आहोत. तुम्ही नेहमी देता तशीच साथ आम्हाला देत रहा.

जय हिंद!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply