Skip to main content

पुनरावलोकनातील महिना – फेब्रुवारी (2022 Month in Review – February 2022)

By मार्च 1, 2022मार्च 29th, 20222 minute read

नमस्कार मित्रांनो! फेब्रुवारीमध्ये वझिरएक्समध्ये काय घडले त्याचा हा मासिक अहवाल आहे.

गेल्या महिन्यात काय घडले?

[झाले] 19 नवीन बाजार जोड्या: आम्ही गेल्या महिन्यात आमच्या यूएसडीटी (USDT) बाजारात 13 टोकन्स आणि आमच्या आयएनआर (INR) बाजारात 6 टोकन्स जोडले! तुम्ही आता वझिरएक्सवर एलएझेडआयओ (LAZIO), पीओआरटीओ (PORTO), एसएएनटीओएस (SANTOS), बीआयसीओ (BICO), क्यूएनटी (QNT), डीयूएसके (DUSK), एसीएच (ACH), स्पेल (SPELL), टीएफयूईएल (TFUEL), केएनसी (KNC), एसएलपी (SLP), एफआयडीए (FIDA), आयडीईएक्स (IDEX), टी (T), डीएआर (DAR), एनएमआर (NMR), आणि जेएएसएमवाय (JASMY) खरेदी करू शकता, विक्री करू शकता, व्यापार करू शकता. तुमच्या आवडत्या जोड्यांचा व्यापार येथे सुरू करा! 

Get WazirX News First

* indicates required

[झाले] फॅन टोकन सप्ताह: वझिरएक्सने 09 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान फॅन टोकन सप्ताह गिव्हअवेसाठी एसएस लाझियो (SS Lazio), एफसी पोर्तो (FC Porto), आणि सांतोस एफसी (Santos FC) यांच्याबरोबर सहकार्य केले. हे फुटबॉल आणि क्रिप्टोच्या निस्सीम चाहत्यांना समर्पित केले होते – ‘फॅन टोकन सप्ताहाने’ देशभरातून चाहते मिळवले आणि सहभागींना $960 किंमतीचे बायनान्स फॅन टोकन्स जिंकण्याची संधी दिली. अधिक तपशील येथे.

[झाले] 25 लाख किंमतीचे भव्य बीआयसीओ (BICO) गिव्हअवे: वझिरएक्स आणि बायकॉनॉमी (बीआयसीओ/BICO) यांनी 11 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारी 2022 दरम्यान अनेक उपक्रम आणि विलक्षण गिव्हअवे होस्ट कण्यासाठी भागीदारी केली. ₹25 लाख (~$33,700) किंमतीचे गिव्हअवे दिले जाणार होते. अधिक तपशील येथे. 

[झाले] वझिरएक्सबरोबर बिल्ड (BUIDL) सुरू केले: आंत्रप्रूनर्सच्या पुढील पिढीला वझिरएक्सचा फायदा घेऊन त्यांचे स्वतःचे एक्सचेंज तयार करण्यास सक्षम करण्यासाठी, आम्ही ‘वझिरएक्सबरोबर उभारणी करा’ या नावाचा उपक्रम सुरू केला. आता साधने, सहाय्य, मार्गदर्शन, आघाडीचे एंजल/व्हीसी गुंतवणूकदारांचा अॅक्सेस, आणि इतर बरेच काही हाताच्या बोटांवर उपलब्ध असतील. येथे अधिक शोध घ्या. 

आपण कशाची उभारणी करत आहोत?

[सुरू आहे] एएमएम (AMM) प्रोटोकॉल: आमचे डीईएक्स (DEX) अवलंबून असलेल्या काही प्रोटोकॉल्समध्ये अनपेक्षित विलंब झाला आहे. हे आम्हाला लाईव्ह जाण्यापासून प्रतिबंध करत आहे. याला किती वेळ लागेल याबद्दल या क्षणाला, आम्हाला ईटीए (ETA) नाही. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी, आम्ही आमच्या प्रोटोकॉल टीमबरोबर कठोर परिश्रम घेत आहोत याची खात्री बाळगा.

[सुरू आहे] नवीन टोकन्स: आम्ही येत्या काही आठवड्यांमध्ये वझिरएक्सवर अधिक टोकन्स सूचिबद्ध करत आहोत. तुमच्या काही सूचना आहेत का? कृपया आम्हाला @WazirXIndia वर ट्विट करा.

काही ठळकचित्रे

  • आम्ही टेलिग्रामवर ‘वझिरएक्स हिरो ऑफ द मन्थ’ सुरू केले. अधिक तपशील येथे मिळवा. 
  • तुम्हाला तुमची खरेदी प्राधान्ये सानुकूलित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही आमचे अॅप अद्ययावत केले आहे.
    • तुम्ही तुमची क्विकबाय (QuickBuy) स्क्रीन सानुकूलित करू शकता आणि तुमच्या पसंतीनुसार कॉईन्स/टोकन्सची क्रमवारी लावू शकता. तुम्ही – सर्वाधिक ट्रेड झालेले, सर्वाधिक लाभ घेणारे, सर्वात कमी किंमत आणि बरेच काही – अशा घटकांवर आधारित तुमची पसंती ठरवू शकता.
    • तुम्ही अॅपवर प्राइस अलर्टसुद्धा सानुकूलित करू शकता. तुम्हाला एवढेच करायचे आहे – तुमच्या पसंतीची कॉईन्स/टोकन्स निवडा आणि अलर्ट्स समायोजित करा. ते कशासाठीही असू शकते – उदाहरणार्थ, किंमतीत बदल, लहान, मध्यम किंवा मोठे.
  • आमच्या अद्ययावत अॅपच्या माध्यमातून (अँड्रॉईड आणि IOS), तुम्ही आता सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न (FAQ), क्रिप्टोमध्ये व्यापार कसा करायचा यावरील गाईड्स, रुपयांमधील ठेवी, पी2पी व्यापार, आणि इतर बरेच काही अॅपमध्येच वाचू शकता (“सपोर्ट अँड कॉन्टॅक्ट अस” विभाग). तसेच युझर्स अॅपमधून थेट सपोर्ट क्विकली चॅट सुरू करू शकतात.

हा आमच्यासाठी उत्पादक महिना राहिला आहे, आणि आम्ही मार्च 2022 कडे बऱ्याच आशेने आणि सकारात्मकतेने पाहत आहोत. तुम्ही नेहमीच करता तसे आम्हाला सहाय्य करत राहा.

जय हिंद!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply