Skip to main content

महिन्याचा आढावा – जानेवारी 2022 (Month in Review – January 2022)

By फेब्रुवारी 1, 2022फेब्रुवारी 16th, 20222 minute read

नमस्ते सहकार्‍यांनो! जानेवारी महिन्यात WazirX मध्ये काय घडले याचा अहवाल आम्ही येथे देत आहोत.

गेल्या महिन्यात काय घडले?

[पूर्ण केले] 20 नवीन मार्केट पेअर्स/ जोड्या: गेल्या महिन्यात आमच्या USDT मार्केट मध्ये आम्ही 8 टोकन्स आणि आमच्या INR मार्केट मध्ये आम्ही 12 टोकन्सची भर घातली! WazirX वर तुम्ही आता COCOS, AMP, CTXC, VOXEL, ONE, NEAR, ENS, POWR, ROSE, ANT, ARDR, GRT, OOKI, CREAM, BTTC, GLMR, ANY, आणि XNO इ. ची खरेदी, विक्री आणि व्यापार करू शकता. तुमच्या आवडत्या जोड्यांचा व्यापार करण्यास येथे सुरूवात करा!

[पूर्ण केले] भव्य EZ बक्षिस: WazirX व EasyFi यांनी अनेक कार्यात आणि 4 जानेवारी ते 14 जानेवारी 2022 या अवधीत विस्मयकारक बक्षिसे देण्यात भागीदारी केली. $47,100 एवढ्या मूल्याचे बक्षिस खुले होते. अधिक तपशील येथे आहेत.

[पूर्ण केले] भव्य PUSH बक्षिस: WazirX व Ethereum Push Notification Service (EPNS) यांनी अनेक कार्यात आणि 27 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2022 या अवधीत विस्मयकारक बक्षिसे देण्यात भागीदारी केली. $25,500 एवढ्या मूल्याचे बक्षिस खुले होते. अधिक तपशील येथे आहेत..

[पूर्ण केले] UFT स्वागत ऑफर: WazirX व UniLend यांनी 27 जानेवारी ते to 31 जानेवारी या अवधीत प्रजासत्ताक दिनाच्या मोहिमेत अनेक कार्यांत आणि अनेक विस्मयकारक बक्षिसे देण्यात भागीदारी केली. सर्वांना आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची ओळख करून देणे हा त्याचा हेतू होता आणि या साठी फक्त क्रिप्टोव्हर्स मध्ये प्रवेश घ्यायचा होता. $20,000 एवढ्या मूल्याचे बक्षिस खुले होते. अधिक तपशील – येथे आहेत.

[पूर्ण झाले] गुरुकुल कांगडी येथे नि:शुल्क ब्लॉकचेन पाठ्यक्रम : विद्यार्थ्यांसाठी हा एक शैक्षणिक उपक्रम आहे आणि गुरुकुल कांगडी (भावी विद्यापीठ) द्वारा संचलित हा उपक्रम WazirX च्या सहयोगाने व न नि:शुल्क आहे. ब्लॉकचेन व क्रिप्टो बद्दल त्यांना हवे ते सर्वकाही जाणूघेण्याजोगे सर्व काही, WazirXचे सह-संस्थापक सिध्दार्थ मेनन यांच्या कडून विद्यार्थी नि:शुल्क शिकू शकता. अधिक तपशील येथे आहेत.

आम्ही काय निर्माण करत आहोत?

[प्रगतीपथावर] AMM प्रोटोकॉल: आमचे DEX ज्यावर अवलंबून आहे त्या काही प्रोटोकॉल्स मध्ये काही अनपेक्षित विलंब झाला आहे. या मुळे आम्हाला लाइव्ह होण्यात विलंब होत आहे. या क्षणी, यास किती वेळ लागेल या बद्दल अपेक्षित वेळेचा/ ETA चा आमच्याकडे अंदाज नाही. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी आमच्या प्रोटोकॉल टीमबरोबर आम्ही कठीण परिश्रम करत आहोत या वर विश्वास ठेवा.

[प्रगतीपथावर] नवीन टोकन्स: येणार्‍या आठवड्यांत आम्ही WazirX वर आणखी टोकन्सचे लिस्टिंग करणार आहोत. तुम्हाला काही सुचवायचे आहे का? @WazirXIndia वर कृपया आम्हाला ट्वीट करा.

काही ठळक मुद्दे

  • या महिन्यात #HumansOfCrypto Season 2 चे आणखी 2 एपिसोड्स आम्ही सादर केले आहेत.
    • एपिसोड 1 👇                      
    • एपिसोड 2👇
  • क्रिप्टोची उत्साही मंडळी त्यांचा आवडता क्रिप्टो ब्लॉग आता कन्नड मध्ये वाचू शकतात!
  • 24 जानेवारी 2022 पासून, आयएनआर-INR (भारतीय रुपये) मार्केट्स मध्ये फी भरतांना या पुढे WRX वापरले जाणार नाही . त्या ऐवजी, तुमच्या WRX बॅलन्सवर अवलंबून तुमची ट्रेडिंग फी कमी करण्यात ते मदत करेल. तुम्ही USDT, BTC, व WRX मार्केट मध्ये अजूनही WRX वापरून व्यापार फी भरू शकत असलात तरीही तुम्ही व्यापार फी फक्त आयएनआर-INR मध्येच भरू शकाल. अधिक तपशील येथे पहा.

आमच्या साठी हा महिना अनेक घटनांनी भरलेला ठरला आहे आणि आम्ही फेब्रुवारी 2022 कडॆ खूप आशा आणि सकारात्मकतेने पाहत आहोत. नेहमीप्रमाणेच आम्हाला पाठिंबा देत रहा.

जय हिंद! 🇮🇳

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply