Skip to main content

वझिरएक्स वापरकर्त्यांसाठी समर्पित फोन सेवा सादर करत आहे (WazirX Introduces Dedicated Phone Support For Users)

By जुलै 2, 2021डिसेंबर 21st, 20212 minute read
WazirX

नमस्ते मित्रांनो! विशेषत: तुमचा पैसा गुंतलेला आहे अशा वेळी ग्राहक सेवा वेळेवर मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे आम्ही जाणतो. याच कारणासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही एक समर्पित टेलिफोन सेवा प्रस्तुत केली आहे हे तुम्हाला सांगण्यात मला खूप आनंद होत आहे. होय, तुमच्या प्रश्नांचे अधिक वेगाने निरसन करण्यासाठी तुम्ही आमच्या सेवा टीमला थेट फोन करू शकता.

त्याच्या वापरकर्त्यांसाठी समर्पित फोन प्रस्तुत करणारे वझिरएक्स हे पहिले भारतीय क्रिप्टो एक्स्चेंज आहे.

फोन सेवेसाठी वझिरएक्सशी कशा प्रकारे संपर्क करावा?

हे खरोखरच अगदी साधे आहे. तुम्ही 0124-6124101 / 0124-4189201 वर किंवा आमच्या टोलफ्री क्रमांक 1800-309-4449 वर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.

आमची समर्पित सहाय्य टीम दररोज (होय, आठवड्याच्या शेवटी सुद्धा) भारतीय वेळेनुसार सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत उपलब्ध आहे. कोणतेही प्रश्न, उत्पादनाशी संबंधित समस्या आणि तुमच्या उपलब्ध सपोर्ट टिकट निरसनासाठी देखील तुम्ही आमच्या सहाय्य टीमला फोन करू शकता.

आमची फोन सहाय्य टीम सोमवार ते रविवार, भारतीय वेळेनुसार सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत उपलब्ध आहे.

थांबा, आणखी काही आहे!

गेल्या काही महिन्यात, आमच्या साइन अप आणि प्रमाणात आम्ही अभूतपूर्व वाढ पाहिली आहे. फेब्रुवारी 2021 पासून आम्हाला मिळणाऱ्या सेवा विनंत्यांच्या सरासरी संख्येत यामुळे 400% वाढ झाली आहे. कोविडमुळे समस्या आणखी कमी तर झाल्या नाहीतच कारण आमच्या सहाय्य टीमपैकी 40% पेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोविड-19 ची बाधा झाली.

आम्ही शिकत आहोत आणि अधिक देवाणघेवाण हाताळण्यासाठी आमची टीम व प्रणालीत सुधारणा करत आहोत. तंत्रज्ञान आघाडीवर, आमच्या व्यवहार इंजिन अद्ययावत करण्यासाठी आम्ही प्रोजेक्ट रफ्तारवर काम करत आहोत. टीमच्या आघाडीवर, आम्ही काही विस्मयकारक आकडे तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो.

  • आमची सहाय्य टीम आम्ही 400% ने वाढवली आहे आणि त्यांनी काम करणे अखंड चालू ठेवले आहे.
  • मे महिन्यामध्ये, वापरकर्त्यास उत्तर देण्यासाठी आमच्या टीमला अंदाजे 6 दिवस लागत असत. आज तेच काम करण्यासाठी आम्हाला 14 तास लागतात.
  • आज कोण्त्याही सेवा विनंतीचे निराकरण आमच्या टीमकडून 4 दिवसात होते. मे महिन्यामध्ये आमचा निरसन अवधी 16 दिवस होता.

टीप: आम्ही लवकरच लाइव्ह चॅट देखील सुरू करणार आहोत!

मित्रांनो, आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही आपले सदैव आभारी आहोत. आम्ही दिवसेंदिवस आणखी चांगले बनत जाऊ असे मी वचन देतो.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply