Table of Contents
प्रिय मित्रांनो!
तुमच्या क्रिप्टो प्रवासाचा एक भाग बनण्यात आम्हाला आनंद होत आहे. तुम्हाला कोणतीही मदत लागली तर वझिरएक्स मधील आम्ही सर्वाजण तुमच्या सेवेसाठी हजर आहोत याची खात्री बाळगा. आमच्या मार्गदर्शिका वाचल्यानंतर तुम्हाला काही चिंता असतील तर तुम्ही आमच्याशी कधीही येथे संपर्क साधू शकता.
वझिरएक्स मार्गदर्शिका
- वझिरएक्सवर अकाउंट कसे उघडायचे?
- वझिरएक्सवर केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची?
- वझिरएक्सशी बॅंक खाते कसे जोडायचे आणि आयएनआर कसे जमा करायचे?
- मोबिक्विकद्वारे तुमच्या वझिरएक्स वॉलेट मध्ये आयएनआर कसे जमा करायचे?
- वझिरएक्स क्विकबाय वैशिष्ट्य वापरून क्रिप्टो कसे खरेदी करायचे?
- वझिरएक्सवर क्रिप्टोची खरेदीविक्री कशी करायची
- वझिरएक्स मध्ये क्रिप्टो कसे जमा करावे व काढावे/विथ्ड्रॉ करावे?
- वझिरएक्समध्ये व्यापार शुल्काचा हिशेब कसा केला जातो?
- स्टॉप-लिमिट ऑर्डर कशी जारी करायची?
- वझिरएक्सवर ट्रेडिंग रिपोर्ट/व्यापार अहवाल कसा डाऊनलोड करायचा?
- वझिरएक्स पी2पी/WazirX P2P कसे वापरायचे?
- वझिरएक्स कन्व्हर्ट डस्ट वैशिष्ट्य कसे वापरायचे?
- वझिरएक्स रेफरल वैशिष्ट्याचे फायदे काय आहेत?
- वझिरएक्सचे अधिकृत चॅनल्स कोणते आहेत आणि वझिरएक्स सेवा कशी प्राप्त करावी?
वझिरएक्स वर खाते उघडणे
वझिरएक्स बरोबरच्या क्रिप्टो प्रवासाच्या दिशेने तुम्ही टाकलेले हे पहिले पाऊल आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर किंवा वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला प्रथम साइन अप करावे लागेल. सुरुवात कशी करायची ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊ या:
पायरी 1:
ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा वेबसाईट उघडा.
- iOS डिव्हाइसेसवर ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
- अँड्रॉइड डिव्हाइसेसवर ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
- वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
मोबाईल ॲप्लिकेशनवर होमस्क्रीन:
वेबवर होमस्क्रीन:
पायरी 2:
मोबाईल: होमस्क्रीनवर गेट स्टार्ट/ सुरू करा वर क्लिक करा.
ॲप्लिकेशनवर वरच्या डाव्या कोपऱ्यातील “सेटिंग्ज”वर क्लिक करा.
वेब: साइन अप नाऊ/ आता साइन अप करा वर क्लिक करा.
पायरी 3:
मोबाईल:
- तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि एक पासवर्ड निवडा.
- तुमच्याकडे असल्यास रेफरल कोड प्रविष्ट करा.
- साइन अप वर क्लिक करा.
कृपा करून नोंद घ्या: “साइन अप” वर क्लिक करण्याआधी सेवेच्या अटी जरूर वाचा (खाली उल्लेख केलेल्या)) . साइनअप करून तुम्ही आमच्या सेवेच्या अटींशी सहमती दर्शवता.
वेब:
पायरी 4:
- खाते पडताळणी प्राक्रियेसाठी पुढे जा.
- पडताळणी ईमेल:
- पडताळणी ईमेलसाठी तुमचा इनबॉक्स तपासा.
- व्हेरिफाय ईमेल बटनावर क्लिक करा किंवा मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- टू फॅक्टर ऑथेंटिकेशन- द्वि घटकीय अधिकृतीकरण
- तुमच्या पसंतीचा सुरक्षेचा प्रकार निवडा.
- तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्याकडे तीन पर्याय आहेत:
- ऑथेंटिकेटर ॲप (अत्यंत सुरक्षित:शिफारस केलेले)
- मोबाईल एसएमएस (माफक प्रमाणात सुरक्षित)
- काहीही नाही (सुरक्षित नसलेले)
मोबाईल:
वेब:
- ऑथेंटिकेटर ॲप
- दिलेला कोड स्कॅन करण्यासाठी गुगल ऑथेंटिकेटर किंवा ऑथी डाउनलोड करा.
- कोड स्कॅन करा.
- नेक्स्टवर क्लिक करा.
मोबाईल:
वेबसाईट:
- गुगल ऑथेंटिकेटर किंवा ऑथी एका मोबाईल डिव्हाईसवर डाउनलोड करा.
- ऑथेंटिकेटर ॲप्लिकेशन वापरून दिलेला कोड स्कॅन करा.
- मोबाईल एसएमएस
- तुमचा दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा.
- सेंड ओटीपीवर क्लिक करा.
- मिळालेला ओटीपी प्रविष्ट करा.
- ईमेलद्वारे पाठवलेली विनंती मंजूर करा
- काहीही नाही: हा पर्याय वापरकर्त्याला टू फॅक्टर ऑथेंटिकेशनशिवाय पुढे चालू ठेवणे शक्य करतो.
आणि मग तुमचे काम झाले आहे. तुमचे वझिरएक्स खाते यशस्वीरीत्या तयार झाले आहे. ह्यापुढची पायरी केवायसी प्रक्रियेसह पुढे जाणे आहे आणि त्यानंतर तुमची काम करण्यास आणि व्यापार करण्यास तयारी झालेली असेल. केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी हे समजण्यासाठी तुम्ही आमच्या पुढील मार्गदर्शिका पहा.
व्यापाराचा आनंद घ्या!
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.